Wednesday, March 19, 2008

cultural difference.

"सयू, स्टार्ट पॅकिंग अप । वी आर गोईंग टू इंडिया धिस समर."

"मॉम प्लीज कीप मी आऊट ऑफ़ धिस। आय ऍम नॉट गोईंग टू कम विथ यू. आय ऍम गोईंग फ़ॉर ट्रेकिंग विथ माय फ़्रेंडस "

"अग पण एक महिन्याचा तर प्रश्न आहे। आणि सारखी असतेसच की तुझ्या फ़्रेंडस बरोबर। आजी आजोबा वाट बघत असतील तुझी. गेली दोन वर्ष जमलच नाहीये."

"नो मॉम आय हॅव ऑलरेडी सेड येस। आय कान्ट चेंज माय प्लॅन । ऍन्ड ऍज इट इज....."

"घरात मराठी बोलायच ठरलय ना आपल? "

"ओके॥ हे बघ तसही वन्स इन अ वीक आजी आजोबांशी बोलतेच ना मी? माझ्या लॅपटॉप वर एक क्लिक केल की माझी तिथे व्हर्च्युअल इमेज त्यांच्याशी बोलते। अगदी त्यांच्या हॉलमधे त्यांच्या सोफ़्यावर बसून बोलल्यासारख"

"अग पण सयू"
"कॉल मी सेली"
"शी: सेली काय ? किती छान नाव आहे सायली अगदी फ़ुलासारख नाजूक। बर ते जाऊ देत... अग व्हर्च्युअल आणि ऍक्च्युअल मधे काही फ़रक आहे का नाही?"

"तुम्ही नाही का तुमची फ़ायनान्स बजेट ऑल ओव्हर वर्ल्ड नेट मीटिंग मधे ठरवता. मग इथे काय प्रॉब्लेम आहे?"
"अग आपली माणस, नाती, प्रेम हे सगळ व्हर्च्युअली नाही होत ग."
"मॉम डोन्ट स्टार्ट इट अगेन।"

खाडकन दार वाजल। जास्त वाद घालण्यात अर्थ नव्हता. अरविंद उर्फ़ ए के येई पर्यंत काय करायचं म्हणून बाहेर पडले. संध्याकाळचे साडे सात वाजले होते. बाहेर लख्ख उन पडलं होतं. चक्कर मारुन आल्यावर परत विषय कसा काढायचा हाच विचार डोक्यात होता. अजूनही गारठा होता. थोडं थोडं बर्फ़ पडतच होत. स्प्रिंग सुरु होई पर्यंत असचं चालायचं. आजूबाजूला सगळं गोठलेलं असलं तरी विचार काही गोठत नव्हते. ट्रेन ट्रॅकला पॅरलल चालत राहिले. मन भूतकाळात गेलं. चौदा वर्षापूवी सायली एवढसं पिल्लू असताना इथे आलो आणि इथलेच झालो. नवीन देश, नवीन वेष, नवीन संस्कृती ........... हळू हळू सवय झाली. इथे मी फ़िरताना बघायचे प्रत्येकाला मिनिमम तीन मुलं. इंडियामधे " एक ही बस " या पाट्या वाचल्यावर इथे तीन पाहिल्यावर आश्चर्य वाटायचं. आणि अशी १-२ वर्ष अंतर असलेली असायची. दोन दिसली की अरविंद म्हणायचा तिसर पोटात असेलच. पण एकही आईने मुलाला उचलून घेतलय , जवळ घेऊन गोंजारलय अस दिसायच नाही. सायली सारखी माझ्या कडेवर मला बिलगून सगळे अनोळखी चेहेरे बघायची. मी म्हणजे तिचा भक्कम आधार होता.

ट्रेन धडधड करत गेली। मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. परत फ़िराव म्हणून अबाऊट टर्न घेतला. एक कपल किस करताना दिसल. साऱ्या जगाला विसरून एकमेकांच्या बाहुपाशात विरघळले होते. हाऊ रोमॅंटिक... असा डोक्यात विचार आला. दुसऱ्या क्षणाला माझ्यातली आई जागी झाली. वाटल माझी लेकही अशीच रस्त्यावर कुठेतरी.....नाही नाही. ती अस करणार नाही. माझे संस्कार आहेत तिच्यावर. कॅनडा मधे वाढली तरी आपण आहोत भारतीय.

मोबाईलवर फ़ोन लावला।"सयू, व्हेअर आर यू?
"ऍम विथ माय फ़्रेंडस मम्मा"

"चिल डाऊन ऍन डोन्ट वेट फ़ॉर मी। बाय। लव्ह यू।"परत खाड
"अग पण....." आवाज पोचलाच नाही
हीच तर खंत आहे माझा आवाज पोचतच नाहीये तुझ्यापर्यंत.
चिल अनघा चिल... ह्या चिल्ड वातावरणात चिल होण जमलच नाही मला। विचार अजूनच पेटले. फ़ुंकर घालून निखारे फ़ुलवल्यासारखे. आई बाबांना किती वेळा म्हंटल या इकडेच राहायला. नुसते येऊन ट्रिप करुन गेले पण इथे नाही जमत म्हणायचे. इंटरनेट, चॅटिंग, वेबकॅम आता तर व्हर्च्युअल इमेज पर्यंत येऊन पोचलो पण गोष्टी ऐकत आजीच्या दुलईत झोपण्याची मजा ह्या पोरांना कळायचीच नाही.

"हे..... वॉच आऊट" कोणीतरी ओरडलं
"ओह....ऍम सो सॉरी....."
सॉरी आणि थॅंक्यू तर अस पेरत जायच असत इथे कॉंग्रेस गवतासारख अमाप पीक आहे त्याचं इथे

घरी आले. घरी सामसूम. फ़ोन पाहिला. ए के चा व्हॉईसमेल "ऍम ऑन माय वे. टेन मिन..."
ओके चला आता भिंतींशी तरी बोलाव लागणार नाही. अरविंद आलाच.
"हाय हाऊ वॉज युअर डे?"
"ओके तू फ़्रेश हो मग बोलू "
"सयू कुठय?"
"फ़्रायडे नाईट ऍम विथ माय फ़्रेंडस मम्म...... डोन्ट डिस्टर्ब..."
"हा हा हा तू कशाला तिला डिस्टर्ब करतेस चिल"
"तूच म्हणायचा राहिला होतास चिल...... कुठल्या गोऱ्या का काळ्या मूलाबरोबर फ़िरत असेल कुणास ठाऊक"
"अनघा डोंट थिंक टू मच लेट हर एंजॉय "
"एंजॉयच्या आपल्या कनसेप्ट्स खूप वेगळ्या होत्या अरविंद। माझ्या विचारांना त्या बाहेरच्या बर्फ़ात ठेऊन येते म्हणजे तरी गोठतायत का ते बघते. जाऊ देत तू तरी जेवणार आहेस का ? "
"हो चल सॉलिड भूक लागलीये।"
"मी आज सयू जवळ विषय काढला तर ती नाही म्हणतीये यायला। तू एकदा बोलून बघ ना। "
"हमऽम .............. "
"असा थंड रिस्पॉन्स नको। मी तिला एकटीला इथे सोडून नाही जाणार. तिला घेऊन जाऊ. ती इथे एकटी म्हणजे मला तिथे टेन्शन परत ........ "
"अग हो हो। मी बोलतो म्हंटलं ना ? "
सगळी आवराआवरी करेपर्यंत १० वाजले। उगाच नेट सर्फ़ करून झालं. १०० वेळा आत-बाहेर करून झालं.
"अरविंद , आजून आली नाही रे। ....... तो टी.व्ही. बंद कर आधी , इट्स १२ ओ’क्लॉक. आली वाटतं. तू बोल हं तिच्याशी. "
"हमऽम ............. "
"हम नाही बोल ..... "
"हाय सेली " "हेय डॅड , वॉट्स अप ? "
"सयू , मॉम वॉज सेइंग ........... "
"डॅड, इज इट नेसेसरी तू टॉक राइट नाऊ। "
"येस डिअर , कम सिट डाऊन स्पेंड सम टाईम विथ युअर मॉम ऍंड डॅड ऑल्सो धिस समर वी आर प्लॅनीग टू व्हिजिट इंडिया "
"डॅड ......... आय हॅव माय ओन प्लॅन्स "
"बट...."
"अरविंद तिला सरळ सांग तिला याव लागेल तुझे प्लॅन्स ठेव बाजूला,"
"मॉम यू कान्ट फ़ोर्स मी लाईक धिस"
"सयू पण अग आपला देश, आपली माणसं...."
"आपला नाही मॉम तुझा....... आय ऍम अ कॅनडियन. डू यू वॉन्ट टू सी माय पासपोर्ट?"

खाड... यावेळी माझ्या मनात आवाज आला। काहीतरी तुटत होतं. आत कुठेतरी खोल सलत होतं. दोन वर्षाची सयू आठवली..... पहिल्यांदा हाएई म्हणायला शिकली तेव्हाची. इतकी गोड म्हणायची अगदी कॅनडियन टोन मधे. आम्हाला इतकं कौतुक वाटल होत. तिच बोलणं टेप करुन सगळ्यांना पाठवलं होत. आई-बाबा, मावशी , आत्या सगळ्यांना. आज जाणवतंय सयू कॅनडियन होण्याची ती पहिली पायरी होती. नंतर आठवली पाच वर्षांची सयू तिच नाव सेली सांगायची. तसही तिच्या फ़्रेंडस ना साऽ य़ ऽ ली असं म्हणता यायचं नाही. आम्ही म्हणायचो सो क्युट. पण माझे तिला धरुन ठेवायचे प्रयत्न कमी पडू लागले होते. मग आठवली सात वर्षाची सयू सॉरी सेली... बीफ़ बर्गर खायचा हट्ट करणारी. खूप मार खाल्ला होता तिने त्या दिवशी. अशीच ती निसटत गेली माझ्या हातातून. वाळू जशी निसटत जाते ना तशी. जितकं घट्ट पकडायला जावं तितकी अजूनच निसटते. मला कोणीतरी हलवत होतं. कोण आहे...

अरविंद हां "अनु डोन्ट फ़ोर्स हर। लेट हर गो व्हेअरएव्हर शी वॉन्ट्स "
"अरे पण...... " शब्दच संपले।
गोठले अचानक बाहेरच्या बर्फ़ासारखे। जिभेपर्यंत आले होते ना मग कुठे गेले तिथेच गोठले का?
"लुक मॉम, मला नाही यायच तिथे। इट इज सो क्राउडेड। आय लव्ह आजी आजोबा. पण तिथे मला विचित्र वाटतं. झूमधल्या प्राण्याकडे कसे सगळे बघतात तसा मी एक प्राणी आहे अस वाटतं. आय फ़ील अनकंफ़र्टेबल."
"अग पण आपल्या माणसांमधे....."
"नो मॉम. आता इथली माणसं हीच माझी माणसं आहेत। आय डोन्ट वॉन्ट टू बी ऍन ऑड मॅन आउट हिअर। मी मराठी बोलते, मला शुभं करोति येतं....एवढं बास आहे। लहानपणापासून ह्या कल्चरल डिफ़्रन्स मधे मी सापडलीये। घरी तू एक सांगायचीस शाळेत मैत्रीणी वेगळं सांगायच्या। खूप त्रास होतो अडजस्ट व्हायला. मी माझा मार्ग निवडलाय. डोन्ट कंपेल मी टू लीव्ह धिस हाऊस."
"सयू काय बोलती आहेस। कितीही झाल तरी आपण भारतीय़ आहोत। आपले संस्कार वेगळे आहेत..."
"थांब मॉम. हा सगळा विचार तुम्ही आधी करायचा होतात. डॉलरच्या मागे लागून तुमचा देश सोडून आलात ना तेव्हाच तुमचे संस्कार, तुमची नाती मागे राहिली. डोन्ट ड्रॅग देम हिअर प्लीज."


खाड खाड खाड......... काहीतरी कोसळत होतं. माझ्याच मुलीने माझ्या तोंडात मारल्यासारख वाटत होत. धडाम काहीतरी पडल. पण काय? भिंत, संस्कारांची भिंत कोसळली.... पार जमीनदोस्त झाली. संस्कारांची भिंत बांधत राहिले मी पण त्यावरून येणाऱ्या वाऱ्याला नाही अडवू शकले.
"चल अनू इट्स टू लेट...झोप चल। चिल। त्रास नको करुन घेऊस."
"खरच अरविंद ........इट्स टू लेट ...... चिल......... अचानक गोठल्यासारख वाटतय. हात पाय मन..सार काही बधिर....चिल.................................

9 comments:

Jaswandi said...

chhan lihilayt!
hi goshta manala khup touch karun jate. anagha ani sayali doghincha vyaktichitran mast jamalay!
ashya don cultures madhe gurfaTalya janarya mulanchi kharach khuhp viichitra parishtiti hote na!

Abhijit Galgalikar said...

its spine-chilling .... kharach aahe ... dollar chya mage lagun apan bharatiyatwa sahaj sodun deto ... pan ajun ek mhanje mala asa watata ... ki sanskar mhanun je kahi asata naa .. tyat baal manachya observation cha hi khup hissa asto ... apan bharatat je kahi baghato tyamule apale sanskar ajun paay ghatt rovtat ... tithe tase naahi .. tikade tyaa sanskarana rujayala panich milat nahi ... jabardastine rop jaminit khupasalyasarkhe te houn jaatat ani asha kuthalya prasangat te dhadkan war yetaat ....

mast lihile ahe....

janhavi said...

Tu lehelele katha vachle khup chan lehele aahes

vaishali said...

Hi dear,
sakali uthale aani tujhi katha wachali.tu chaan lihiliyes.vishay toch toch asla tari sagali patra aaplya samor ubhi aahet aani aapan tynach bolna aiktoy asa vatat hota wachtana....
mala aavadli...

Soniya said...

Deepa..
mast lihila aahes..tuzya lekhanachya shaily mule kathetali patra dolyasamor ubhi rahat aahet ekadam..surekhach!!
pan jata jata manat vicharchakra chalu zala..kharch welet punyat parat gela pahije..nahitar apala hi asach hoil ka??
navin likhanasathi Shubhechha!!

Prachi said...

Hi Deepa .. pahilich goshta kharach khup chan zali ahe ... good effort .. pan tuza potential tyat janavala nahi .. rather vishay mala khup common vatala ani goshta predict karata yet hoti ... pan tarihi tu lihayala lagalis ( Aamachi bavi lekhika !!!)mhanun kharach khup chan vatatay ... maja ahe amachi ek gayika ani ek lekhika ... chan vataty !!! All the best for next story ...

pallavi said...

sahi lihila ahes... sagle mhantat tasa sagla chitra dolasamor ubha rahta :)

Manish said...

Hi Deepa,
tujhi katha touching ahe ani aajchya context madhe fit baste. Anaghachya manat honari ghalmel manala bhidte. katha vachun asa vatat nahi ki tujhi hi pahilich katha ahe.
A very good first effort! keep the good work going, all the best!

Pallavi said...

Hi deepa,
Damn good story. A real touchy story. It was like the moment u start reading it...u get more and more curious to know what happens next...
keep writting.....