Thursday, April 3, 2008

दुरावा

सहन होइना दुरावा एकही क्षणाचा
एक एक क्षण वाटे कित्य़ेक युगांचा

अतूट असे संबंध , फ़ुलाचा नि सुगंधाचा
आलास प्रत्यक्षात की आभास हा मनाचा

कुणी नसता का येई पडसाद पावलांचा
कुणी नसता का चाले खेळ सावल्यांचा

नि:स्तब्ध क्षणी जाणवे नाद अंतरीचा
ठोका असे तुझ्या की माझ्याच ह्रुदयीचा

मनास ना उमजे ऋणानुबंध शतकांचा
सत्यवान प्रत्येक जन्मी फ़क्त सावित्रीचा

दीपा

0 comments: