Monday, April 28, 2008

डायरी

चाळता चाळता

थांबले काही तारखांवर

पानं फ़ाडलेली ...

काही आठवू नये म्हणून

आणि लख्खं आठवलं

सगळं काही

एक एक शब्द लिहिलेला

मिटवलेला

पानं फ़ाडली ना

की ती आठवणीत

जाऊन बसतात

उगाच गर्दी नको ती ...

दीपा

0 comments: