आणि ती फ़ुलराणी करपून गेली
ह्या जगाच्या रहाटगाडग्यात अडकून गेली
किती निष्पाप होती ती
अगदी बालकवींनी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा
पण उतरली ह्या जगामधे जेव्हा
हरवून गेली , गोंधळून गेली
जगाच्या वागण्यातून खूप काही शिकून गेली
अजूनही ती हसते , अगदी खळाळून हसते
पण त्यातील निर्व्याज हसू
इथे येऊन ती विसरून गेली
प्रतिष्ठेचं , समाजाचं भान ठेऊन आपलं बाल्य विकून गेली
असं का झालं , असं कुणी केलं
कोण येऊन , मनाचा ठाव घेऊन
तिचा डाव उधळून गेलं
तिला म्हंटलं , असच असतं हे जग आपलं नसतं
चांगुलपणा मनात ठेवून दिखाऊपणा शिकून गेली
दीपा
Monday, April 28, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment