त्याची साद
माझी धाव
त्याचं सांभाळणं
माझं विसावणं
त्याचं जखडणं
माझं निसटणं
त्याचं हसणं
माझं रुसणं
त्याचं फ़ुलवणं
माझं उमलणं
त्याचं साकारणं
माझं आकारणं
त्याचं तरसणं
माझं बरसणं
त्याची रग
माझी धग
त्याचं रुजवणं
माझं बहरणं
त्याची पखरण
माझी साठवण
त्याची तृप्ती
माझी भक्ती
त्याच्या नसण्याने
माझं फ़सणं
त्याच्या असण्याने
मी माझी नसणं
त्याची मी
माझा तो
त्याच्यातली मी
माझ्यातला तो
दीपा
0 comments:
Post a Comment