आज वाटतय ऊन सोनेरी अलवार
फ़ुलतीये कळी पुन्हा नाजूक हळुवार
गवताच्या पात्याला चढतीये धार
पुन्हा काही आशा तलम ऊबदार
पावलं सारी ठेक्यात लयदार
आज स्पर्शात एक नवा शहार
सारं जुळून आलंय तरी काहीतरी बिनसतंय
कितीही टाके घातले तरी मन पुन्हा उसवतंय
जीर्णच झालंय कापड त्याला ठिगळ बसत नाही
पाऊस अजून तसाच, होड्या सोडायचा अल्लडपणा नाही
दीपा
0 comments:
Post a Comment