Monday, January 21, 2008

संधीप्रकाश

संध्याकाली सूर्य मावळताना संधीप्रकाश पडतो सूर्य दिसत नाही पण प्रकाश असतो खूप छान वाटत त्या वेळेस पण आपल्या मूड प्रमाणे आपल्याला तो प्रकाश वाटतो ... त्याच वर्णन आहे हया कवितेत ...



उजळलेल तरीही झाकोळलेल
पारदर्शक तरीही दाटलेल
अगदी हळव आणी भरलेल
तेजस्वी पण प्रखर नसलेल
अवघ्या आसमंताला व्यापलेल
उधळलेल तरीही सावरलेल
डोळ्यात सामावताना पारण फिटलेल
इथून मला दूर तिथून त्यालाही जाणवलेल
अगदी संयमित तरीही ओथंबलेल
उभारी देणार आणी कारुण्य जाणवणार
दिवसानंतर तरीही रात्रीच्या आधी असणार
हो-नाहीच्या सीमांच्या मधल अंतर गाठणार


दीपा

Friday, January 11, 2008

मी कोण? मी उर्मीला ....1

This narrates the feelings of Urmila..wife of Lakshman rom Ramayana. A feeling of being ignored.



ओळखलत का मला?
मी कोण ? मी उर्मीला
लक्ष्मणाची अर्धांगिनी उर्मीला
कौसल्या, कैकेयी तुम्हाला माहीत असेल
सीता म्हणजेच जानकी, मैथिली सुद्धा माहीत असेल
अगदी मंथरा दासीसुद्धा माहीत असेल
पण मी ? माझी ओळख पुसली गेली असेल
काळाच्या पडद्याआड धूसर होत गेली असेल



दशरथाच पुत्रप्रेम तुम्ही चर्चिलत
लक्ष्मण भरताच बंधुप्रेम तुम्ही चर्चिलत
सीतेच पतीप्रेम, हनुमंताची भक्ती,
वानरांची फौज, खारीचा वाटा, रावणाची नीती
सगळ काही तुम्ही गोष्टी-गोष्टीतून चर्चिलत
एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगते
माझी व्यथा आज मी कथेतून मांडते
रामायण जाणलत पण उर्मीलेचा त्याग जाणलाच नाहीत



मला सोडून लक्ष्मण वनवासात निघून गेला
जाताना माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आखून गेला
सासू-सासरयांची,कर्तव्याची, अपेक्षांची
"वाट बघ माझी " अशी शिक्षा मला देऊन गेला
अनेकदा वाटल, सगळ सोडून वनवासात निघून याव
पती नसलेल्या संसाराला त्यागून जाव
वनवास मीही भोगलाय हया राजमहालात
पण माझा संयम कोणी जाणलाच नाही



सीतेने दिली अग्नीपरीक्षा , ती महान ठरली
पण माझी सत्वपरीक्षा कुणा न कळली
शरीरातल्या अग्नीशी मी चौदा वर्ष झगड़लिये
फ़क्त माझ्या पतीदर्शनासाठी व्याकुल झालीये
जाऊ दे मी एक सामान्य स्त्री आहे
अभिमानाने सांगते लक्ष्मणाची पत्नी आहे
ओळख ठेवा एवढीच विनंती मला विसरू नका
परत कधी भेटलो तर कोण उर्मीला विचारू नका


दीपा

Wednesday, January 2, 2008

जरा ऐक श्रीकृष्णा

Have u heard the story of shrikrishna..once he rescued some girls from the prison of some danav..the count of the girls was 16108. After relieving they said we will suicide..कारण हा समाज आम्हाला जगू देणार नाही so shrikrishna said I will marry u. So he married all of them. But this marriage was just for the sake of name..this poem narrates the feelings of one of those girls..by designation she was queen but was unsatisfied with this kind of adjustment.. कारण तिला प्रेम नाहीच मिळाल This not necessarily with shrikrishna as a god..but it symbolises for those who have been married to many girls.



शुभमंगल सावधान
डोक्यावर अक्षता पडल्या
आणि श्रीकृष्णाच्या गळयात
सोला सहस्त्र वरमाला पडल्या


काल होते मी एक कैदी
आज राजाची राणी आहे
दोन फाटकी वस्त्र होती
आज भरजरी शालू आहे


कुंकवाचा धनी मिळाला
पण राधेचा सखा कुठय ?
सोन्याचा राजमहाल आहे
पण मन मात्र रितय


समाजाची फिकीर कोणाला
कोठ्यावरती नाचले असते
नाहीतर एखाद्या शिपायाची
कारभारीण म्हणुन नांदले असते


जगासाठी असशील रे तू
सर्वश्रेष्ठ महान आणी मोठा
संसार कशाला मांडलास माझ्याशी ?
असा दिखाऊ आणि खोटा


एक मात्र सांगू तुला ?
तुझ कार्य सोडू नकोस
अवतार घे पुन्हा पुन्हा
पण एकपत्नीव्रत सोडू नकोस


दीपा