व्हॅलेन्टाइन्स डे झाला तरी
काही आठवणी तरंगतायत
लाटा शांत झाल्या तरी
काही तरंग अजून उठतायत
सार काही स्वप्नासारख
सिंड्रेलाच्या गोष्टीसारख
एक बूट ठेऊन येऊन
राजकुमाराची वाट बघण्यासारख
मी एक मुलगी साधी सुधी
कधी न कुणाच्या अधी मधी
स्वप्नांची वाट हीच माझी सखी
वास्तवात मला स्थान नव्हते कधी
वाटायच मलाही राजकुमार हवा
त्याचा घोडाही पांढराशुभ्रच हवा
आपला जोडा आरशात न्याहाळावा पण
आरशात डोकावताच भ्रमाचा भोपळा फ़ुटावा
पण शेवटी माझही नशीब खुलल
माझ्याकडेही गुलाबाच फ़ूल फ़ुलल
मलाही कुणीतरी अस भेटल
ज्याला रुपापेक्षाही मनाच सौंदर्य कळल
दीपा
Thursday, February 28, 2008
Friday, February 15, 2008
वाट बघताना
सूर्य अस्ताला जाता जाता उगीचच रेंगाळला
म्हणाला आज एकटीच ? थांबू का सोबतीला?
मी म्हंटल नको , तुझ्या साक्षीने घेतलेल्या शपथा
त्याच्या साऱ्या आठवणी, आहेत माझ्या सोबतीला
एकदम समोरच्या खिडकीतून एक ढग डोकावला
बघून मला धुक होऊन अगदी खाली उतरला
चल म्हणाला क्षितिजापर्यंत फ़िरत फ़िरत जाऊ
मीच म्हंटल नको तुझ्याशिवाय एकटी कशी जाऊ?
समुद्राची एक लाट गर्जत गर्जत आली
अगदी माझ्या जवळ येऊन ओळखीच हसली
मला काही आठवेना की ही ओळख कुठली?
अरे माझ्या डोळ्यातल्या खारट लाटेला ती फ़सली
डोंगर मला वाटायचा फ़ारच रुक्ष
पण एवढ्या दुरून त्याच माझ्याकडे लक्ष
म्हणाला वाऱ्याला त्याच्याकडे पाठवलय
तुझ्यासाठी आज त्याला लवकर यायला सांगितलय
तुझी वाट पाहायला दार उभ राहिलय
उंबऱ्यावर पालथ घातलेल भांडही कंटाळलय
कितीही समजावल तरी मन कुठे ऐकतय ?
छोट्याशा आवाजाबरोबर चाहूल घ्यायला धावतय
दीपा
म्हणाला आज एकटीच ? थांबू का सोबतीला?
मी म्हंटल नको , तुझ्या साक्षीने घेतलेल्या शपथा
त्याच्या साऱ्या आठवणी, आहेत माझ्या सोबतीला
एकदम समोरच्या खिडकीतून एक ढग डोकावला
बघून मला धुक होऊन अगदी खाली उतरला
चल म्हणाला क्षितिजापर्यंत फ़िरत फ़िरत जाऊ
मीच म्हंटल नको तुझ्याशिवाय एकटी कशी जाऊ?
समुद्राची एक लाट गर्जत गर्जत आली
अगदी माझ्या जवळ येऊन ओळखीच हसली
मला काही आठवेना की ही ओळख कुठली?
अरे माझ्या डोळ्यातल्या खारट लाटेला ती फ़सली
डोंगर मला वाटायचा फ़ारच रुक्ष
पण एवढ्या दुरून त्याच माझ्याकडे लक्ष
म्हणाला वाऱ्याला त्याच्याकडे पाठवलय
तुझ्यासाठी आज त्याला लवकर यायला सांगितलय
तुझी वाट पाहायला दार उभ राहिलय
उंबऱ्यावर पालथ घातलेल भांडही कंटाळलय
कितीही समजावल तरी मन कुठे ऐकतय ?
छोट्याशा आवाजाबरोबर चाहूल घ्यायला धावतय
दीपा
Labels:
Kavita
Wednesday, February 13, 2008
लोक काय म्हणतील?
Everytime we feel like doing anything..we always think what people will think about it. It restricts our imotions, our reactions. Look at the child it enjoys life as its his own world. Dont think about others..just do it.
आज मन कापसासारख हलक हलक झाल
वारयाबरोबर तरंगत जाऊ सहजी ते म्हणाल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
कापसामधल्या बी सारख जड़ होउन बसल
आज मन नदीसारख चंचल अवखळ झाल
वळसे घेऊ विळखे घालू दुनियेला म्हणाल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
बर्फासारख गोठुन मन एकाजागी खिळल
आज मन ठुमरीसारख ठुमकत ठुमकत निघाल
ताना घेऊ शीळ घालू किंचाळू म्हणाल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
गज़लेसारख उदास उदास कोपरयात जाऊन बसल
आज मात्र मन माझ भरून भरून आल
बरसून जाऊ मोकळ होऊ मेघासारख म्हणाल
लोक काय म्हणतील अस दूसर मन म्हणाल
हुलकावणी देणारया ढगासारख पुढे पुढे निघाल
आज मन डायरीच्या पानासारख झाल
आपली कथा सारयांना सांगुया म्हणाल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
पाण्याने फिसकटलेल्या शाईसारख झाल
आज मन कापराच्या वडीसारख झाल
सर्वस्वा अर्पण करायला तुझ्याकडे धावल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
मेणबत्तीच्या ज्योतीसारख नुसतच जळत राहिल
आज मन झोक्यासारख उंच उंच झाल
आकाशाला टेकून येऊ सहजी ते म्हणाल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
घड्याळाच्या काट्यासारख चौकटीतच फिरल
आज मात्र दोघांच मोठ भांडण झाल
मरत मरत जगण्यापेक्षा मरुया म्हणाल
मग मात्र दूसर मन ताळयावरती आल
म्हणतील ते म्हणू दे आपण जगुया म्हणाल
दीपा
आज मन कापसासारख हलक हलक झाल
वारयाबरोबर तरंगत जाऊ सहजी ते म्हणाल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
कापसामधल्या बी सारख जड़ होउन बसल
आज मन नदीसारख चंचल अवखळ झाल
वळसे घेऊ विळखे घालू दुनियेला म्हणाल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
बर्फासारख गोठुन मन एकाजागी खिळल
आज मन ठुमरीसारख ठुमकत ठुमकत निघाल
ताना घेऊ शीळ घालू किंचाळू म्हणाल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
गज़लेसारख उदास उदास कोपरयात जाऊन बसल
आज मात्र मन माझ भरून भरून आल
बरसून जाऊ मोकळ होऊ मेघासारख म्हणाल
लोक काय म्हणतील अस दूसर मन म्हणाल
हुलकावणी देणारया ढगासारख पुढे पुढे निघाल
आज मन डायरीच्या पानासारख झाल
आपली कथा सारयांना सांगुया म्हणाल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
पाण्याने फिसकटलेल्या शाईसारख झाल
आज मन कापराच्या वडीसारख झाल
सर्वस्वा अर्पण करायला तुझ्याकडे धावल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
मेणबत्तीच्या ज्योतीसारख नुसतच जळत राहिल
आज मन झोक्यासारख उंच उंच झाल
आकाशाला टेकून येऊ सहजी ते म्हणाल
लोक काय म्हणतील अस दुसर मन म्हणाल
घड्याळाच्या काट्यासारख चौकटीतच फिरल
आज मात्र दोघांच मोठ भांडण झाल
मरत मरत जगण्यापेक्षा मरुया म्हणाल
मग मात्र दूसर मन ताळयावरती आल
म्हणतील ते म्हणू दे आपण जगुया म्हणाल
दीपा
Labels:
Kavita
Subscribe to:
Posts (Atom)